Posts

Showing posts from January, 2025

MPSC Exam: स्पर्धा परीक्षेचा विचार करताय? मग जाणून घ्या 'एमपीएससी' म्हणजे नेमके काय?

Image
स्पर्धा परीक्षांचे महत्व बरेच वाढले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेतील मोठी पदे मिळवण्यासाठी विद्यार्थी शाळेपासूनच या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला लागतात . यामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने यूपीएससी / एमपीएससी चा अभ्यास करताना दिसतात.  पण ही 'एमपीएससी' नेमकी आहे काय.. हे जाणून घेऊया. ⦁ MPSC पूर्ण फॉर्म (Full form of MPSC) एमपीएससी (MPSC)चा फुल फॉर्म आहे Maharashtra Public Service Commission म्हणजे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’. या आयोगा मार्फत जी परीक्षा घेतली जाते तिला एमपीएससी परीक्षा म्हणतात.  ⦁ महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल थोडक्यात माहिती ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ ही भारतीय राज्यघटनेने कलम ३१५ अन्वये निर्माण केलेली सरकारी संस्था आहे. जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेतील अधिकारी पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन करते. त्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता आणि राज्याच्या आरक्षणाच्या पूर्व-निर्धारित नियमांच्या आधारे या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील विविध प्रशासकीय विभागात वर्ग-3 पासून वर्ग-1 पर्यंतच्या अधिकाऱ्‍यांची भरती प्रक्रिया पू...